Pune Baramati Crime | बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबार! सायंकाळी सव्वा 7 वाजताची घटना, पोटाच्या खाली गोळी लागल्याने रिपोर्टर रूग्णालयात

पुणे / बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Baramati Crime | बारामतीच्या भिगवण रस्त्यावरील (Bhigvan Road, Baramati) रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका पत्रकारावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पत्रकार गंभीररित्या जखमी झाला असून त्यास बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे (DySP Ganesh Ingale) आणि पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Baramati Crime )

 

पत्रकारावर गोळीबार झाल्याने संपुर्ण पुणे जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश जाधव Reporter Ganesh Jadhav (30, रा. तांदुळवाडी – Tandulwadi) असे जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. आज सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पत्रकार गणेश जाधव हे भिगवण रोडवरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. गोळी गणेश जाधव यांच्या पोटाच्या खाली लागली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी (Pune Rural Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अद्याप गोळीबाराचे ठोस कारण समोर आलेले नाही. (Firing On Reporter In Baramati)

पत्रकार गणेश जाधव यांचे रायजिंग महाराष्ट्र नावाचे वृत्तपत्र आहे.
त्यांच्यावर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
दरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने पत्रकार गणेश जाधव (Journalist Ganesh Jadhav) यांच्यावर गोळीबार केल्याची चर्चा आहे.
प्रकरणाचा अधिक तपास बारामती पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Baramati Crime | Firing on journalist at Bhigwan Road in Baramati!
Incident at 7:30 pm Reporter in hospital with bullet wound below abdomen,
pune rural police on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा