पुणे : रोजगारकरिता बिडी कामगार उतरले रस्ता वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील एकुण सात बिडी कारखाना मधून सुमारे 7000 घर खेप पध्दतीने बिडी वळण्याचे काम 20 मार्च 2020 पासून लाॅकडाऊन मुळे बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे ऊपासमारीला सामोरे जावे लागत आहे. हातावर पोट असलेल्या घर खेप बिडी कामगारांना काम त्वरित मिळावं या करिता भारतीय मजदूर संघाने 10जुलै 2020 रोजी प्रातिनिधक स्वरूपात महाराष्ट्र बिडी ऊद्योग संघाचे अध्यक्ष साबळे वाघिरे यांच्या पुणे कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

बीडी कामगारांची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन त्यांची ऊपासमार होतं आहे.बीडी कारखाने त्वरित सुरू करून सर्व बिडी कामगारांना रोजगार देण्यात यावा अन्यथा संघटनेला राज्य व्यापी त्रिव आंदोलन करावं लागेल असा इशारा अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे ( संलग्न भारतीय मजदूर संघ)सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी दिला आहे. या वेळी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे सचिव सचिन मेंगाळे यांनी मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारने बिडी कामगारांना प्रतिमाह निर्वाह भत्ता म्हणून 6500 रू त्वरित कामगारांचा बॅंकेचा खात्यात जमा करण्यात यावे

अशी मागणी केली
बिडी कामगारांना अत्लप वेतन मिळते लाॅकडाऊन मुळे कारखाने बंद राहील्या मुळे कामगारांची अवस्था बिकट झाली असुन त्यांना न्याय मिळण्याच्या हेतुने 28 मार्च 2020 रोजी संघटनेने भारत सरकारच्या बिडी कामगार कल्याण मंडळा कडे लाॅकडाऊन काळात जिवन जगण्या साठी बेरोजगार भत्ता ची मागणी केली होती. पण यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भारत सरकारने दि 29/03/2020 आदेशानुसार लाॅकडाऊन चा कालावधी तील संपुर्ण वेतन देण्याचे आदेश कारखानदारांना दिले होते परंतु या आदेश नुसार कोणत्याही बिडी कारखानदारांनी वेतन अदा केलं नाही. म्हणून कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथे संपुर्ण वेतन आदेशानुसार वेतन देण्याची मागणी केली आहे पण अद्याप पर्यंत कार्यवाही न केल्या मुळे बिडी कामगार संपूर्ण वेतना पासून वंचित आहेत.

भारत सरकारच्या 20/04/2020 रोजी च्या आदेशाने लाॅकडाऊन मधून विविध क्षेत्रातील ऊद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी दिली होती. म्हणून भारतीय मजदूर संघाने 23/04/2020 रोजी बिडी ऊद्योगातील काम घरातुन चालत असल्याने ऊद्योग सुरू करण्याची मागणी गृह मंत्रालय केंद्रीय यांच्या कडे केली होती या नुसार अनेक राज्यातील शहर गावांमध्ये ऊद्योग सुरू झाले पण पुणे शहरातील बिडी ऊद्योग सुरू न झाल्याने कामगार मधे त्रिव नाराजी व असंतोष निर्माण झालेला आहे.

वेळोवेळी बिडी ऊद्योग कारखानांदार भेटून कामगारांच्या व्यथा मांडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून नाईलाजाने संघटनेला रोजगार करिता रस्ता वर उतरून नाय मागावा लागला. रेशनची अपुरी व्यवस्था, सरकार वतीने आर्थिक मदत न मिळणे, सामाजिक सुरक्षाचा अभाव ई समस्या मुळे बिडी कामगारांना रोजगार त्वरित मिळणे आवश्यक आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ ,) सरचिटणीस उमेश विस्वाद, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सचिव सचिन मेंगाळे, बिडी प्रतिनिधी कस्तुरी बडगु, लता मद्दी, विजया लक्ष्मी येमुल, मुक्ता कोटा व वासंती तुम्मा यांनी केले .