Pune : येरवड्यातील सह्याद्री, इनलॅक्स बुधरानी, नोबल, भारती आणि पूना हॉस्पीटलमधील बेडस् मनपाच्या नियंत्रणाखाली : डॉ. शांतनु गोयल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना रुग्णांना बेडस् उपलब्ध नसल्याच्या तक्रारीवरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासनही पुन्हा अंग झटकून कामाला लागले आहे. अजित पवार यांनी अत्यवस्थ कोरोना बाधितांसाठी महापालिकेने रुग्णालयातील बेडस्चे नियंत्रण करण्याच्या आदेशानंतर काही तासातच पाच खाजगी रुग्णालयातील बेडस् नियंत्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातूनच या रुग्णालयातील बेडस्चे नियंत्रण केले जाणार असून याठिकाणी गरजू रुग्णांना बेडस् उपलब्ध करून देण्याची यंत्रणा अधिक काटेकोर केली जाणार आहे.

शहरातील गंभीर रुग्ण संख्या वाढत असताना ग्रामीण तसेच अन्य शहरातील गंभीर रुग्णही पुण्यात उपचारासाठी येत आहेत. रुग्णसंख्या मोठी असल्याने प्रामुख्याने ऑक्सीजन, व्हेंटीलेटर आणि अतिदक्षता विभागातील बेडस् मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे उपचारास विलंब होउन रुग्णही दगावत आहेत. यासंदर्भातील तक्रारींवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी झालेल्या बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांना चांगलेच ङ्गैलावर घेत महापालिकांच्या माध्यमांतून शहरातील विविध रुग्णालयांतील बेडस्चे नियंत्रण करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तातडीने या दिशेने पावले उचलली असून शहराच्या विविध विभागातील पाच खाजगी हॉस्पीटलमधील कोरोना बाधितांच्या बेडस्चे नियंत्रण महापालिकेकडे घेतले आहे. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी सांगितले, की येरवडा येथील सह्याद्री हॉस्पीटल, कात्रज येथील भारती हॉस्पीटल, हडपसर येथील नोबल हॉस्पीटल, कोरोगाव पार्क येथील बुधरानी हॉस्पीटल आणि सदाशिव पेठेतील पूना हॉस्पीटलमधील कोरोना बाधितांसाठीच्या बेडस्चे नियंत्रण महापालिका करणार आहे. याठिकाणी उपलब्ध असलेले ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स, अतिदक्षता विभागातील बेडस् आणि काही प्रमाणात जनरल बेडस्चे नियंत्रण महापालिका करणार आहे. महापालिकेकडे रुग्णांकडून बेडस्ची मागणी आल्यानंतर महापालिकेने रेङ्गर केल्यानंतरच ही रुग्णालय कोरोना रुग्णांना दाखल करून घेणार आहे. जिल्ह्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणार्‍या रुग्णांसाठी काही बेडस् रिझर्व्ह ठेवण्यात येणार असून त्याचा निर्णय संबधित हॉस्पीटलवरच राहील.

येरवडा येथील सह्याद्री हॉस्पीटल, कोरोगाव पार्कमधील इनलॅक्स बुधराणी, हडपसर येथील नोबल, कात्रज येथील भारती आणि सदाशिव पेठेतील पूना हास्पीटल या पाचही खाजगी हॉस्पीटसोबत महापालिकेने यापुर्वीच करार केलेला आहे. महात्मा ङ्गुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असलेल्या रुग्णांचे उपचार या योजनेतील अटीशर्तींनुसारच होणार आहेत. तसेच पुर्वीप्रमाणे अन्यखर्चाची जबाबदारी संबधित रुग्णांचीच राहाणार आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णांना लवकर बेडस् मिळावे, यासाठी अधिक नियोजनबद्ध यंत्रणा राबविण्यासाठीचे नियंत्रण महापालिकेकडे राहील.
– डॉ. शांतनु गोयल ( अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त)