Pune : शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 8 वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अजय शिवकुमार पासवान (वय 21, रा. धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्यासोबत वाहन चोरी देखील तेजीत आहे. पार्किंग केलेल्या दुचाकी बनावट चावीने पळवल्या जातात. दिवसाला किमान 3 दुचाकी चोरी होत आहेत. पण चोरटे काही सापडत नाहीत. यादरम्यान स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना या चोरट्यांना पकडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना एकजण कोंढवा रोडने दुचाकीवर संशयित रित्या जात असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार अधिक सखोल चौकशीत त्याने शहरात विविध भागातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी श्रीधर पाटील, गणेश सुतार, निलेश खोमणे, प्रणव संपकाळ, हर्षल शिंदे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, समीर बागसीराज यांच्या पथकाने केली.

You might also like