Pune : भाटघर अन् वीर धरण ओव्हर-फ्लो तर नीरा देवघर 91.11 % आणि गुंजवणी 95.20 % भरलं

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंम्मदगौस आतार) –   गेल्या पंंदरा दिवसांंपासूून नीरा खो-यातील
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे अखेर गुरूवारी (दि.२०) मध्यरात्री भाटघर धरण ओव्हरफ्लो झाले. त्या पाठोपाठ वीर धरणही ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नीरा डाव्या व उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांची चिंता मिटली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाटघर धरणाकडे शेतकऱ्यांसह सर्वांचेच डोळे लागले होते. मात्र प्रत्यक्षात गुरूवारी (दि.२०) मध्यरात्री भाटघर धरण १०० टक्के भरून फुल्लं झाले. तर वीर धरणही पुर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहे. त्यामुळे भाटघर व वीर धरणाच्या पाण्यावर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेणारे पुणे, सातारा, सोलापुर जिल्ह्यातील शेतकरी समाधानी झाले असल्याचे चित्र आहे.

भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी ( दि.२०) सकाळी सहा वाजेपर्यंत १० मि.मी.पाऊस पडल्याने भाटघर धरणात २३.५०२ टि.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध झाला असून धरण पुर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहे. तर नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणाच्या परिसरात पाऊस पडल्यानंतर त्या परिसरातील पाणी व वीर धरणाच्या परिसरातील पाणी वीर धरणात येत असल्याने वीर धरणात ९.४०८ टि.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध झाला असून अखेर गुरूवारी (दि.२०) पहाटे चार वाजता वीर धरण १०० टक्के भरले.

नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३१ मि.मी. पाऊस पडल्याने नीरा देवघर धरणात १०.६८६ टि.एम.सी पाणीसाठा उपलब्ध झाला असून धरण ९१.११ टक्के भरले आहे.तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १० मि.मी.पाऊस पडल्याने धरणांत ३.५१३ टि.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध झाला असून धरण ९५.२१ टक्के भरले आहे.

भाटघर धरण १०० टक्के ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या ४५ स्वयंचलित दरवाजातून आपोआप गुरूवारी (दि.२०) सकाळी आठ वाजता ४ हजार २०० क्युसेक्स त्यानंतर सकाळी नऊ वाजता ७ हजार क्युसेक्स व त्यानंतर दोन वाजता विसर्ग कमी होऊन ५ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू झाल्याचे भाटघर धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग नीरा नदीतून वीर धरणात आल्याने व नीरा देवघर व गुंजवणी धरण परिसरातून वीर धरणामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने अखेर वीर धरणामधून पुन्हा नीरा नदीपात्रात गुरूवारी (दि.२०) सकाळी आठ वाजता तीन दरवाजातून १४ हजार ७११ क्युसेक्सने व सकाळी अकरा वाजले पासून पाच दरवाजातून २३ हजार ९८५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात आल्याने या आठवड्यात पुन्हा नीरा नदी दुधडी वाहू लागली आहे. त्यामुळे गुरूवारी संध्याकाळी नीरा येथी प्रसिद्ध दत्तमंदीराच्या पाय-या पाण्याखाली गेल्या होत्या.

दरम्यान, भाटघर, वीर धरण फुल्लं झाल्याने वीर धरणाखाली असलेल्या नीरा उजवा व नीरा डाव्या कालव्यावर अवलंबून असणा-या सिंचन क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.