Pune Bhavani Peth Crime | जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bhavani Peth Crime | जेवण वाढताना झालेल्या वादातून पत्नीने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील पत्र्याच्या चाळीत घडला आहे.

याबाबत जखमी रमेश बबन ससाणे (वय-43 रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जया रमेश ससाणे (वय-34 रा. भवानी पेठ, पुणे) हिच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत.
रविवारी सायंकाळी रमेश ससाणे हे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जयाने त्यांच्याकडे 500 मागितले.
पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जया जेवण वाढत असताना रमेश यांनी ताट आणि तांब्या आपटला.
तसेच तिला कानशिलात लगावली. या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
रागाच्या भरात जयाने रमेश यांच्या दंड
आणि पाठीवर चारूने वार करुन जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार भोसले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना