Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Bhusar Market । पुण्यातील भुसार बाजार विभागातील (Pune Bhusar Market Department) वाहतूक कोंडी हटवणे आणि बाजारात येणाऱ्या वाहनांना (Vehicle) योग्य शिस्त लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खासगी ठेकेदाराला पार्किंगचा (Parking) ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्याला तेथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. म्हणून समितीने काही जागा कमी करून पाच ठिकाणच्या 61 हजार स्क्वेअर फूट जागेसाठीच पार्किंगचा (Parking) ठेका दिला आहे. म्हणून आता बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा समितीने केलाय. Pune Bhusar Market | pay and park at five places in grocery bazaar

‘पे अँड पार्किंग’ (Pay and parking) धोरणाला ‘दि पूना मर्चंट्स’ चेंबरच्या व्यापाऱ्यांनी
विरोध केला होता. बाजार समितीने दुकानासमोरील जागेतील पार्किंगमध्ये व्यापाऱ्यांना शुल्क लागू राहणार नाही.
असं सांगितलं असताना देखील तेथील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.
म्हणून वेगवेगळ्या व्यापारी संघटनांशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Pune Agricultural Produce Market Committee) प्रशासक मधुकांत गरड (Madhukant Garad) यांनी चर्चा केली होती. यावरून सर्व्हिस लेनसह अन्य 27 जागा कमी करून फक्त 5 जागे ठिकाणी ‘पे अँड पार्क’ (Pay and parking) योजना लागू करण्याचे ठरविले.

दरम्यान, पार्किंगच्या निविदेनुसार या आधी 32 जागांचे क्षेत्रफळ 1 लाख 49 हजार 559 स्क्वेअर फूट आहे. तर 12 महिन्यांसाठी 82 लाखांची निविदा दिली होती.
परंतु, सध्या पाच जागांसाठी 81 हजार 306 स्क्वेअर फूट जागेसाठी 44 हजार 71 हजार 830 रुपयांचा ठेका दिलाय.
या दरम्यान, पद्मरेखा एंटरप्रायझेस कंपनीला 1ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी हा ठेका दिला आहे.

 

 

यावरून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड (Madhukant Garad) म्हणाले
की, ‘बाजार समितीला 44 लाख 71 हजार 830 रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात 22 पटीने वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे बाजारातील व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे भुसारातील 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ (Pay and parking) योजना सुरु केलीय.
तर, दुकानासमोर वाहनचालकांकडून शुल्क वसूल केले जात नाही. असं गरड यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Pune Bhusar Market | pay and park at five places in grocery bazaar.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune-Pimpri Chinchwad Police | पुणे अन् पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मोठे बदल, पिंपरी ‘अपग्रेड’ होणार?

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Mansukh Hiren Murder Case | मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाखाचा व्यवहार; NIA चा मोठा खुलासा