Pune : पुण्यातील बड्या व्यावसायिकाला हवा होता पैशांचा पाऊस; पठ्ठ्यानं तब्बल 52 लाख मोजले पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जादूटोणाच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडतो म्हणून फसववणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने 52 लाख रुपये देखील पैशांचा पाऊस न पडल्याने एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला आहे. किसन आसाराम पवार (वय 41, रा. हिवरखेड ता. मंठा) असे अटक केलेल्या भोंदूला अटक केली आहे. याप्रकरणी सिंहरोड पोलीस ठाण्यात गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे. याबाबत 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

यातील तक्रारदार हे मोठे व्यावसायिक आहेत.
दरम्यान, कॉमन मित्राच्या माध्यमातून आरोपी भोंदू किसन पवार याच्याशी ओळख झाली होती. यानंतर फिर्यादी हे दोन ते तीन वेळा त्यांच्याकडे जाऊन आले होते.
यावेळी त्याने वेगवगेळे मंत्र म्हणून आणि माझ्यात दैवी शक्ती असल्याचे बोलून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्यांना थेट पैशांचा पाऊस पडतो असे सांगत काही पूजा करावी लागेल असे सांगितले. फिर्यादी यांचाही यावर विश्वास बसला.
त्यानंतर त्यांना या पूजा करण्यासाठी पैसे लागतील असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळो एकुण 52 लाख 1 हजार रुपये घेतले.
पण त्यांना या भोंदू बाबाने पैशांचा काही पाऊस पाडला नाही. त्यानंतर फिर्यादी यांना आपली फसववणूक होत असल्याचे लक्षात आले.
मग त्यांनी गुन्हे शाखाकडे तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा Crime दाखल करत त्याला जालना जिल्ह्यातून अटक केली आहे.

दरम्यान, भोंदूबाबा किसन आसाराम पवार याने अशा प्रकारचे कोणाची फसवणूक केली असेल किंवा कोणाला पैसे मागितले असतील तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी केले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक निरीक्षक अमृता चवरे, दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

 

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…