Pune : आगामी ‘मनपा’ निवडणुका डोळयासमोर ठेवून भाजपकडून मोठा निर्णय ! माजी खा. संजय काकडे यांच्यावर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   माजी खासदार संजय काकडे यांच्यावर भाजपनं आता मोठी जबाबदारी सोपविली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय काकडे यांची आता प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांना दिलं आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन माजी खा. काकडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. गतवेळी मनपा निवडणूकीत भाजपला मोठ यश मिळालं होतं. त्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यांनी मनपामध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते.

राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार काकडे यांनी केलेले कार्य तसेच संसदेत काकडे यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिनंदनीय असल्याचं भाजपनं म्हंटलं आहे. काकडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटना वाढविण्यासाठी निश्चितपणे होईल असं देखील भाजपानं म्हंटलं आहे.