पुण्याच्या खडकीत ‘टेबल गरम’, पोलिसांचा जुगार अड्ड्यावर ‘छापा’ ; ६३ जुगारी लोक अटकेत, ४५ मोबाईल जप्‍त

पुणे (एनपी न्यूज नेटवर्क) : – शहरातील खडकी परिसरात चालणार्‍या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकून कारवाई केली आहे. हा जुगार अड्डा पुणे शहरातीलच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जुगार अड्डा असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 63 जुगारी लोकांना अटक केल्याची माहिती समोर आली असून त्यांना न्यायालयाने जामिन दिला आहे. या जुगार अड्डयाचा पर्दाफाश झाल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तब्बल 45 मोबाईलसह 2 लाख 77 हजार 513 रूपये आणि जुगाराचे साहित्य जप्‍त केले आहे. हा जुगार अड्डा बबु सब्सस्टीन नायर (रा. दर्गा वसाहत, खडकी) याच्या मालकीचा असून तोच अवैध जुगार अड्डा चालवत असल्याचे पोलिसांना समजले आहे.
Gambling-1
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुगार अड्डयाचा पर्दाफाश करण्यात आला खरा मात्र हा जुगार अड्डा कोणत्याच्या आशिर्वादाने चालत होता हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 63 जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे असून त्यांना न्यायालयाने जामिन दिला आहे.

नासीर मोहीद्दीन कुरेशी (47, रा. नाना पेठ), संदीप शिवाजी आठवले (38, रा. गंगा अपार्टमेंट, संगमनगर, पुणे), बिलाल उस्मान शेख (27, रा. पठाण चाळ, बोपोडी), ताहीर मोहम्मद अली अन्सारी (34, रा. घर नंबर 32, म्हात्रे पुलाजवळ, दत्‍तवाडी), हेमंत रामदास लोंढे (30, रा. चिंचवड गांव, तानाजीनगर), अकबर सरवर बागवान (27, रा. इंदिरानगर, खडकी), हर्षद अरूण कांबळे (26, रा. लक्ष्मीनगर, लेन नंबर 1, सुवर्ण सरस्वती बिल्डींग, पिंपळे गुरव), निलेश निवृत्‍ती चव्हाण (32, रा. रेंजहिल खडकी), अनिकेत बाळासाहेब इंगवले (27, रा. क्रांती चौक, पिंपळे निलख), दिलीप वसंत गोसावी (36, रा. वाळव, जि. सांगली, शेगाव), भालचंद्र भिका सोनजे (54, रा. एनडीएरोड, कवडे हॉस्पीटल जवळ, शिवणे), राहुल पवनकुमार लालवणी (32, रा. फ्लॅट नं. 102, आकाशगंगा सोसायटी, मृणाल लॉज शेजारी, पिंपरी), विकी हरिशकुमार तळरेजा (33, रा. फ्लॅट नं. 102, आकाशगंगा सोसायटी, मृणाल लॉज शेजारी, पिंपरी), शेख मजुद्दिन युनुसानिया (28, रा. मंगल गार्डन, रहाटणी), मनोज करवी गोपाळसिंग (38, रा. जोगीनगर, साईबाबानगर, खडकी), करीम इकबाल शेख (26, रा. अप्पर काकडे वस्ती, सरगम रूम, 651, कोंढवा रोड), योगेश वणप्पा जाधव (34, रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव), युसूफ जानुव खान (21, रा. इराणीवस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर), लक्ष्मण गंगाधर वढे (44, रा. शिवदर्शन, 7/119), नाझीम हमीद शेख (34, रा. खडकी बाजार, इस्माईल बिल्डींग), दिलीप वनवारी सिंग (37, रा. सम्राटनगर, भैरट चाळ, बोपोडी), सोमा वामन म्हस्के (50, रा. डिपी रोड, औंध), सुनिल महादेव जाधव (37, रा. तुळजाभवानी नगर, पिंपळे गुरव), सुनिल बापुराव भोसले (53, रा. मुंबई-पुणे रोड, निरीक्षण विहार, पुणे), दिपक सुरेश लोखंडे (26, रा. घर नं. 105, गवळीवाडा, दर्गा वसाहत, खडकी), धनंजय मारूती चव्हाण (41, रा. घर नं. 15, सुखसागरनगर, माऊलजी कॉम्प्लेक्स, अप्पर इंदिरानगर), प्रेमकुमार गिरीजा प्रसाद सिंग (37, रा. लेन नं. 17, गणेशनगर, बोपखेल, दापोडी), दत्‍ता बर्सेत निकाळजे (33, रा. घर नं. 4, शुरविर तरूण मंडळ, राज बिल्डींग मागे, नदी किनारी, ताडीवाला रोड), सोमनाथ नारायण महाजन (35, रा. गवळी वाडा, खडकी), इजराईल एस. कप्पुस्वामी (32, रा. खडकी), नवनाथ सोपान म्हात्रे (37, रा. खडकी बाजार), मयुर संजय भालेकर (23, रा. रेंजहिल्स खडकी), विशाल कुंवरसिंग परदेशी (26, रा. खैरेवाडी, गणेशखिंड), लेजरस अरिकानाथन (67, रा. शिवम नगर, पिंपळे गुरव), दिलशाद अकबर अली शेख (45, रा. दर्गा वसाहत, खडकी), राजेश पिटर सुंदर (50, रा. मोरे पार्क, पिंपळे गुरव), रविंद्र गोविंद नायर (52, रा. कदम चाळ, खडकी), अमोल सुरेश फल्‍ले (34, रा. औंधरोड, पाटील भाऊ पडाळ वस्ती, भेरवनाथ मंदिर), स्वप्नील रविंद्र टिळेकर (28, रा. रेंजहिल्स, खडकी), राजु एकनाथ तपासे (54, रा. रेंजहिल्स, खडकी), विवेक राम दास (48, रा. शितळादेवी चौक, सांगवी), विनोद मोहन शिंगे (32, रा. वडारवाडी, दिप बंगला चौक), एकनाथ भानुदास भेकरे (33, रा. वाल्हेकर वाडी, शिवणे चाळ, आकुर्डी), जोरीयन सभापती (27, रा. दर्गा वसाहत, खडकी), गणेश दत्‍तु जाधव (43, रा. रेंजहिल्स, खडकी), राजु दिनकर गायकवाड (52, रा. भाऊपाटील वसाहत, औंध), बाजीराव भगवान सावंत (43, रा. औंध, पडळवस्ती), रविंद्र रामण्णा सलादलू (41, रा. खंडोबा माळ, शनिमंदिर जवळ, भोसरी), दिलीप दशरथ धिवर (52, रा. एनसीआर, खडकी), शडती शिवबाळा सुब्रमण्यम (40, रा. रेंजहिल्स, खडकी), अ‍ॅलन गोकुळ सिंग प्रधान (56, रा. रेंजहिल्स, खडकी), मल्‍लिकार्जून हनुमंता दोड्डमणी (33, रा. रेंजहिल्स, खडकी), चन्‍नाप्पा हनुमंता (41, रा. रेंजहिल्स), महिपाल शंकर जेधे (50, रा. पिंपरी मंडईजवळ), शिवाजी श्रीपती वगळकर (60, रा. पंचशीलनगर, पिंपळे निलख, औंध कॅम्प), संजय अनंत रणपिसे (46, रा. चिखलवाडी, खडकी), सुधीर कोंडीराम जाधव (57, रा. चिखलवाडी, खडकी), राम कर्णावरन नायर (72, रा. खडकी), कन्हैय्या शिवप्रसाद परदेशी (72, रा. बोपोडी चौकी समोर), प्रसाद भाऊसाहेब चव्हाण (52, रा. भाजीमंडई, औंधगाव), मनोज शेखर पिल्‍ले (42, रा. खडकी), आनंद धर्माजी खोब्रागडे (75, रा. गणेशनगर, बोपखेल) आणि राजेश प्रसाद सिंग (35, रा. विश्रांतवाडी, कैलास चाळ)

जुगार अड्ड्यांना ‘आशिर्वाद’ देणार्‍यांवर कारवाई होणार का ?
गेल्या अनेक दिवसांपासून खडकीमध्ये हा जुगार अड्डा चालू होता. हा जुगार अड्डा कोणच्या आर्शिवादाने चालू होता आणि त्यांच्यावर पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम् कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे शहरातील अनेक पोलिस ठाण्यात अवैध धंद्दे बोकाळले आहेत. एवढेच नव्हे तर शहरालगत असलेल्या अनेक पोलिस ठाण्यात खुल्‍लमखुल्‍ला अवैध धंदे चालू आहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे वेळावेळी स्पष्ट झाले आहे. शहरालगत असलेल्या जवळपास सर्वच पोलिस ठाण्यात अशा प्रकारचे उद्योग चालू असल्याची चर्चा आहे. त्या पोलिस ठाण्यांकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे देखील बोलले जात आहे. पुण्यातील एका जुगार अड्डयावर तब्बल 63 जुगारी जुगार खेळतात हे इतिहासात पहिल्यांदाच समोर आले आहे. एवढया मोठया प्रमाणावर खडकी परिसरात जुगार अड्डा चालू होता मग संबंधित पोलिस चौकी, पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसह त्या झोनच्या पोलिस उपायुक्‍तांना याबाबतची कल्पना नव्हती की होती असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संबंधित पोलिस अधिकार्‍यांच्या विशेष सेवेत असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना तरी याची कल्पना होती का आणि त्यांचे जुगार अड्डा चालविणार्‍याशी साटेलोटे होते काय हेच गुढ कायमस्वरूपी गुलदस्त्याच राहणार आहे काय असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
Gambling4
जुगार अड्ड्यांना ‘खतपाणी’ कोण घालत ?
शहरालगत अथवा मध्यवस्तीत जुगार अड्डे, अवैध व्यावसाय आणि इतर बेकायदेशीर गोष्टी सर्‍हास चालू असतात. त्यांना कोण आशिर्वाद देत अथवा अशा अवैध धंद्यांना कोण खतपाणी घालत हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अलिकडील काळात पोलिसांनी छापा सत्र सुरू केले आहे. मात्र, अशा प्रकारचे अवैध धंद्ये सुरू करण्यास कोण खतपाणी घालत हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

टीप :-
सुनिल बापुराव भोसले (53, रा. मुंबई-पुणे रोड, निरीक्षण विहार) हे 3 पत्‍ती / तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार पैसे लावून खेळत आणि खेळविताना आढळून आले. राजेश प्रसाद सिंग (35, रा. कैलास चाळ, विश्रांतवाडी) यांच्याकडून 1 लाख 24 हजार 593 रूपये जप्‍त करण्यात आले. सिंग हे कल्याण ओपण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना आढळून आले आहेत.

जप्‍त ऐवज :-
1. एकुण 45 मोबाईल हॅन्डसेट
2. पिवळया रंगाचे प्लास्टिकचे 92 कॉइन्स
3. पोपटी रंगाचे प्लास्टिकचे 85 कॉइन्स
4. तब्बल 48 पत्त्यांचे कॅट
5. नोटा मोजण्याची इलेक्ट्रॉनिक मशिन
6. इतर जुगार घेण्याचे तसेच जुगार खेळण्याचे साहित्य (4 काळया रंगाच्या पाटया)

एकूण रक्‍कम :- 2 लाख 77 हजार 513

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like