दुचाकीच्या धडकेत नागरिक जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी जखमी झाला आहे. चार दिवसांपुर्वी सकाळी दहा वाजता भारती विद्यापीठ रस्त्यासमोर घडली.

याप्रकरणी निळकंठ हातारगे (वय ५०, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीळकंठ एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. चार दिवसांपुर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला. याप्रकरणी भारती विदयापीठ पोलिस तपास करीत आहेत.