डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील डंपरने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुण जागिच मृत्यू झाला. हडपसरमधील सिरम कंपनीजवळ ही घटना घडली. तिपण्णा किसनप्पा राठोड (वय 32,रा. ससाणेनगर, हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी डंपर चालक ब्रम्हानंद देवप्पा नडगे (वय 45, रा. लोणी काळभोर) याला अटक केली आहे.

पोलीस शिपाई अमोल बाबर यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिपण्णा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. शनिवारी सकाळी तो सिरम कंपनीजवळील रस्त्यावरुन दुचाकीवरून जात होता. त्यावेळी समोरुन आलेल्या डंपरचालक ब्रम्हानंदने त्याला जोरात धडक दिली. यात तो खाली पडला. त्याचवेळी भरधाव डंपरचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेले. यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागिच मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक गाडेकर हे करत आहेत.