दुचाकीस्वाराला बेदम मारहाणकरून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लुटमार करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, पुणे-सोलापूर रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला लाकडी बांबूने बेदम मारहाणकरून लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी आकाश सुरवसे (वय 40, रा. कदमवाक वस्ती, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवसे हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्यावरून पुणे-सोलापूर रस्त्याने मांजरी बुद्रुक परिसरात जात होते. यावेळी द्राक्ष संशोधनाजवळ आल्यानंतर पाठिमागून दुचाकीवर दोघेजन आले.

त्यांनी फिर्यादींना अडविले. तसेच, लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोकड आणि मोबाईल असा 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहायक निरीक्षक एच. बी. खोपडे यांनी फिर्याद दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –