पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’?, राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यात बुधवारी (दि. 2) पीएमपी संचालकाच्या राजीनाम्यावरून खडाजंगी झाली. याची काल दिवसभर महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएमपी संचालकपदी नव्या नगरसेवकाला संधी देणार आहेत. त्यासाठी आताचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा (Resigned) घेतला आहे. परंतु हा चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे पीएममीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजीनामा (Resigned) मंजूर झाला नाही.

Maharashtra : 8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल झालाव्हिडीओ

महापौर मोहोळ यांनी स्वतः राजीनाम्यावर सही केली असूनही तो मंजूर झाला नाही.
त्यानंतरच्या बैठकीतही त्यांनी अनेक तांत्रिक मुद्दे का मांडले? असा सवाल बिडकर यांनी उपस्थित केला होता.
त्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. संचालकाचा राजीनामा पीएमपीच्या अध्यक्षाकडे द्यायचा असतो.
मात्र पवार यांनी तो महापौरांकडे दिल्याने गोंधळ उडाल्याचे पीएमपीने सांगितले. मात्र यासंदर्भात वाद न झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Microsoft 24 जूनला सादर करणार नवीन Windows, जाणून घ्या काय असू शकते खास

पक्षाने सांगितल्यानुसार पवार यांचा राजीनामा घेण्यात आला होता. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीला मी उपस्थित नसल्याने राजीनामा का मंजूर झाला नाही. हे महापौरच सांगू शकतील असे बिडकर यांनी स्पष्ट केले.

फरार मेहुल चौक्सीला अँटीगुवातून डोमिनिकाला आणण्यामागे अजित डोवाल यांची ‘स्ट्रॅट्रेजी’

Nagar : भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका, म्हणाले – ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’