Pune BJP News | गत नऊ वर्षात भारताचे विकासपर्व ! कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन PM Modi यांचे विकासकार्य जनतेपर्यंत पोहचवावे; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन, भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune BJP News | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला. (Pune BJP News)

या वेळी बोलताना शहराध्यक्ष जगदिश मुळीक (Pune BJP City President Jagdish Mulik) म्हणाले की, जनतेच्या विकासाचे ध्येय घेऊन पक्ष काम करत आहे पार्टी विथ द डिफ्रन्स खऱ्या अर्थाने फक्त भाजपामध्ये दिसून येते शहरामध्ये फक्त भाजप काम करताना दिसत आहे विरोधक फक्त आपल्या कामाचे श्रेय लाटण्याचा कार्यक्रम राबवत आहे अकेला देवेंद्र क्या करेंगा तो अकेला देवेंद्र सबकुछ करेंगा.

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. (Pune BJP News)

यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul), आमदार सिद्धर्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Dilip Kamble), मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), बापू पठारे (Bapu Pathare), प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari), राजेश पांडे (Rajesh Pandey,), चिटणीस वर्षा डहाळे (Varsha Dahale) यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आज माननीय मोदी यांच्या नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) हे देखील माननीय मोदीजींशी बोलण्यासाठी आतूर असतात. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, आज कर्नाटक निवडणुकीतील (Karnataka Election)
विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे.
आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections)
२८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते.
कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता.
त्यामुळे जगदीश मुळीक यांनी असेच आपले कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी सूचना केली.
तसेच घर चलो संपर्क अभियानाद्वारे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर (OBC Aghadi President Yogesh Tilekar)
यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.‌तर स्वागत गणेश घोष यांनी केले.

 

Web Title :- Pune BJP News | India’s Development Festival in the last nine years!
Activists should go door to door to convey the development work of PM Modi to the masses;
Devendra Fadnavis’ appeal, BJP’s Ghar Chalo Sampark campaign launched in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajnath Singh Pune Visit | संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबनाची गरज’ राजनाथ सिंह यांची DIAT मध्ये विद्यार्थ्यांना साद (VIDEO)