Pune BJP News | BJP च्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या निमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष (Video)

Pune BJP News | On the occasion of the election of Devendra Fadnavis as the group leader of BJP, jubilation on behalf of BJP at Alka Talkies Chowk in Pune (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP News | भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड झाल्या निमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्या निमित्त आनंद साजरा केला.

यावेळी पुणे शहर सरचिटणीस,पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे , सुभाष जंगले,वर्षा तापकीर, प्रमोद कोंढरे, रवींद्र साळे गावकर ,गणेश घोष,माजी नगरसेवक जयंत भावे आदित्य माळवे, अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, पुष्कर तुळजापूरकर,राजू परदेशी ,प्रणव गंजीवाले, उमेश शाह, दिलीप उंबरकर, संदीप काळे उपस्थित होते.

घाटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. राज्यातील युवक आणि महिला यांचा सन्मान आणि उद्धार करण्यासाठी फडणवीस यांची निवड पदावर करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण यांना त्यांचा हक्काचा देवाभाऊ मिळणार आहे. पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधीसाठी उद्या मुंबई मध्ये जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात वाटचाल करतील. 2014 ते 2019 या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे .त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगल्याप्रकारे राज्याला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास राज्यातील जनतेला आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडके भाऊ देखील भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणूकीत राहिलेली आहे. महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळालेले असून विरोधकांचा सुफडा साफ झालेला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#

Mahayuti Govt News : भाजप विधीमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; विधीमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया उद्याच पार पडणार

Mahayuti Govt News | महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, मुख्यमंत्री पदाबरोबर गृहखातंही भाजपकडे राहण्याची शक्यता

PMC News | पुणे महापालिकेच्या विकासकामांची माहिती लवकरच घरबसल्या जाणून घेता येणार; जी.आय.एस. बेस्ड एंटेलिजन्स वर्क्स मॅनेजमेंट सिस्टिमचे काम अंतिम टप्प्यात

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘महापालिका निवडणुक होईपर्यंत एकनाथ शिंदेंना गोंजरले जाईल, लाड पुरवले जातील’, उद्धव ठाकरेंचे भाष्य; म्हणाले – ‘भाजपला मुंबई जिंकायचीय त्यामुळे…’

Total
0
Shares
Related Posts