Pune BJP Protest Against Ajit Pawar | चुकीच्या वक्तव्यासाठी अजित पवार यांनी माफी मागावी; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

पुणे : Pune BJP Protest Against Ajit Pawar | वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केली.

मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आज शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने केली. या वेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. शंभू राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्याअस्मितेचा अपमान असून, तो कदापि सहन केला जाणार नाही. अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष,
राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा,
यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title :- Pune BJP Protest Against Ajit Pawar | Ajit Pawar should apologize for wrong statement; Pune BJP city president Jagdish Mulik’s demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | सिंहगड कॅम्पसमध्ये कोयत्याने दहशत माजवणार्‍या म्होरक्याला अटक

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध