Pune : पश्चिम बंगालमधील भ्याड हल्ल्याचा मांजरीमध्ये भाजपतर्फे जाहीर निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर महिलांवर अत्याचार आणि भ्याड हल्ला करणाऱ्यांचा मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रचार व प्रसिद्धीप्रमुख शैलेंद्र बेल्हेकर यांनी मांजरी बुद्रुक येथे घरासमोर निषेध नोंदवला.

बेल्हेकर म्हणाले की, पश्चिम बंगालमधील निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये जाळण्यात आली. हिंसक हल्ल्यामध्ये काही बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. महिलांवर अत्याचार करीत बलात्कार केल्याच्या घटना घडल्या, अशी अमानुष कृत्ये लोकशाहीला न शोभणारी आहेत. तृणमूल काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ले केले असून, त्यांच्या नेत्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.