×
Homeताज्या बातम्याPune BJP | 100 कोटी डोस पूर्ण झाल्याने पुणे भाजपकडून लसीकरण केंद्रात...

Pune BJP | 100 कोटी डोस पूर्ण झाल्याने पुणे भाजपकडून लसीकरण केंद्रात केक कापून ‘सेलिब्रेशन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारताने कोरोना लसीकरणामध्ये (Vaccination) 100 कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. कोरोना विरुद्धच्या (Corona Fight) लढ्यातील प्रतिकूल परिस्थितीत, सेवा भावना जोपासत भारताने लसीकरणात 100 कोटींचे शतक पूर्ण केले. यापार्श्वभूमीवर पुणे भाजपच्या (Pune BJP) वतीने प्रभागातील लसीकरण केंद्रावर जाऊन केक कापून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पुण्यातील भाजपचे (Pune BJP) पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी भाजपचे आमदार भिमराव तापकीर (BJP MLA Bhimrao Tapkir) म्हणाले, नागरिकांचे आरोग्य हिच आमची प्राथमिकता आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रतिकूल परिस्थितीत, सेवा भावना जोपासत भारताने लसीकरणात 100 कोटींचे शतक पूर्ण केले. याचे श्रेय जाते सर्व टीम इंडियाला, सर्व डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना.

 

यावेळी भाजपा (Pune BJP) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेविका वर्षा तापकीर (Corporator Varsha Tapkir),
माजी नगरसेविका मोहिनी देवकर (Corporator Mohini Devkar), युवा नेते गणेश भिंताडे (Ganesh Bhintade),
खडकवासला विधानसभा मतदार संघ भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन बदक,
अभिषेक तापकीर, शिरीष देशपांडे, सत्यवान कामठे, किरण मारणे, विक्रांत तापकीर व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थितीत होते.

 

Web Title :- Pune BJP | Pune BJP completes 100 crore doses, cuts cake at vaccination center ‘Celebration’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News