Pune : PMPML बससेवा सुरू करावी म्हणून भाजपकडून आंदोलन, पोलिसांनी खा. गिरीश बापट यांच्यासह कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात आजपासून शासनाने कडक निर्बंध घातल्यानंतर आज भाजपच्या वतीने शहरात पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करावी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांना ताब्यात घेतले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक नियम लावले आहेत. आजपासून शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी केली आहे. तर हॉटेल्स, मॉल, धार्मिक स्थळे, गर्दी होणारे ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. त्यात पीएमपी देखील सात दिवस बंद केली आहे. याला भाजपच्या वतीने विरोध करण्यात आला होता. काल देखील झालेल्या बैठकीत खासदार यांनी विरोध दर्शविला होता. त्याच अनुषंगाने आज शहर भाजपच्या वतीने विरोधात आंदोलन केले आहे. भाजपने बस सेवा तसेच हॉटेल्स सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मात्र आंदोलन सुरू होताच पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.