Pune : रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार ! पोलिसांकडून चौघे ताब्यात

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीत अनेक ठिकाणी रेमडिसिवीर इंजेक्शन कमी पडू लागले आहे. असे असताना त्यामध्येही आता काळाबाजार केल्याच्या घटना दिसून येत आहे. सांगवीमध्ये रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या चौघांकडून इंजेक्शन आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असून अशा परिस्थितीत गैरफायदा घेत इंजेक्शनच्या किमती वाढवून त्याची विक्री केली जात आहे. तर असा काळाबाजार करून ते इंजेक्शन तब्बल १० ते २५ हजारापर्यंत इतक्या किमतीची विक्री करत असल्याचे समोर येत आहे. या दरम्यान, सांगवी येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून आज शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे.