Pune Blind Men’s Association | ‘पुणे अंध जन मंडला’चा ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार 2021’ने गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे अंध जन मंडलाचा (Pune Blind Men’s Association) ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार २०२१’ या पुरस्कराने गौरव करण्यात आला. शनिवार (दि. ०४ डिसेंबर) रोजी नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे आयोजित एका कार्यक्रमात निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर (former Director General of Police (DGP), Maharashtra, Jayant Umranikar) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुपये २५०००/- व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (Pune Blind Men’s Association)

 

पुणे अंध जन मंडळाच्या (Pune Blind Men’s Association) वतीने संस्थेचे अध्यक्ष राजेश शहा (Rajesh Shah) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याच कार्यक्रमात जेष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार २०२१ तसेच डॉ. मिलिंद भोई यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार २०२१ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे ऐक्झिकेटीव्ह डायरेक्टर परवेझ बिलिमोरिया व डॉ. राहुल देशपांडे हे उपस्थित होते.

 

 

ह्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष राजेश शहा यांनी सर्वप्रथम पुणे प्रार्थना समाज या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग तसेच पदाधिकारी यांचे पुरस्कार दिल्या बद्दल आभार मानले. पुढे संस्थेची माहिती देताना सांगितले की, पुणे अंध जन मंडळ PBMA (Pune Blind Men’s Association) ही अखंड महाराष्ट्रभर मुख्यतः अंधजन तसेच गरजूंसाठी मोठ्या प्रमाणावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना सन १९६० मध्ये झाली असून तीचे मुख्यालय रास्तापेठ, पुणे येथे आहे. ह्या संस्थेने सन २००० मध्ये महम्मदवाडी-हडपसर येथे ‘एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल’ हे अत्याधुनिक नेत्र रुग्णालय बांधले. हे नेत्र रुग्णालय देशातील अग्र क्रमांकाच्या नेत्र रुग्णालयांपैकी एक आहे तसेच ते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ६० लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे तर ६ लाखांहून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापैकी ४ लाखांहून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

 

ह्या संस्थेमार्फत दृष्टिहीन मुले आणि प्रौढांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन सेवा देण्यासाठी हडपसर येथे तांत्रिक प्रशिक्षण संस्था (टेक्नीकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) TTI सेंटर चालवण्यात येत आहे. जेणेकरून दृष्टिहीन व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि समाजाचे सन्माननीय नागरिक बनू शकतील. या ठिकाणाहून आजपर्यंत हजारो अंधांना प्रशिक्षित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

 

 

संस्थेने धायरी येथे साईबाबा वृद्ध अंध महिलांसाठी वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे,
जिथे वृद्ध दृष्टिहीन महिला त्यांच्या आयुष्यातील सूर्यास्ताची वर्षे सन्मानाने,
शांत आणि प्रसन्न वातावरणात घालवतात. सध्या येथे ४० दृष्टिहीन वृद्ध महिला सुखी जीवन जगत आहेत.

त्याच बरोबर वायव्य महाराष्ट्रातील आदिवासी भागात नेत्रसेवा पुरविण्याच्या उद्देशाने
संस्थेने २००७ मध्ये नंदुरबार येथे कांता लक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय सुरू केले आहे.
ह्या रुग्णालयातही आजपर्यंत ७ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी आणि
५५ हजारांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
त्याच बरोबर आगामी काळात सोलापूर येथे अत्याधुनिक नेत्र रुग्णालय उभारण्याचे नियोजित आहे असेही राजेश शहा यांनी पुढे बोलताना सांगितले.

 

Web Title :- Pune Blind Men’s Association | Pune Andh Jan Mandla honored with ‘Pune Prarthana Samaj – David Roberts Award 2021’-Pune Blind Men’s Association

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा