पुण्यातही सापडला बोगस डॉक्टर, मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र वैद्यक परिषदेची कोणतीही पदवी नसताना स्वतःच्या नावासमोर डॉक्टर उपाधी लावून प्रॅक्टिस करणारा तोतया डॉक्टर सापडला आहे. मुंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. नोव्हेंबर 2019 ते फेबु्रवारी 2020 कालावधीत घडली.

पान्यम रामकृष्ण रेड्डी (रा. मुंढवा, मूळ- उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीनेश बेंडे (वय 51, रा. बिबवेवाडी) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पान्यम मूळचा उत्तर प्रदेशातील असून त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यक परिषदेची कोणतीही पदवी नाही. असे असतानाही तो मुंढव्यातील केशवनगरमध्ये पनयाम हाउसमध्ये डॉक्टर उपाधी लावून प्रॅक्टिस करीत होता. महानगरपालिकेच्यावतीने तपासणीमध्ये पान्यमकडे पदवी नसल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. घाटगे अधिक तपास करीत आहेत.