महाराष्ट्र पोलीस जर्नल अन् पोलीस तपासणी कायदेशीर प्रक्रिया पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस जर्नल आणि पोलीस तपासणी कायदेशीर प्रक्रिया पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

अ‍ॅड. आप्पासाहेब लोखंडे लिखीत पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया आणि महाराष्ट्र पोलीस जर्नल हे पुस्तक सरकारी अभियोग संचानालय महाराष्ट्र राज्याचे संचालक व माजी पोलीस अधिकारी संभाजी पाटील यांनी लिहीले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे अप्पर पोलीस महासंचालक कुलकर्णी, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांसाठी पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया हे पुस्तक महत्वाचे असणार असून, त्यांना तपासासाठी उपयुक्त ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्व प्रभारी अधिकारी व इतरांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असेही यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बोलताना सांगितले. तसेच, लेखकांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.