बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन
शिरुरमधील पोलीस कर्मचा-याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्यातील जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सैन्यदलात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली. या जवानाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
रामुसिंह शुशपालसिंह राठोड (वय:27, सध्या रा. बोपखेल मुळ रा. मध्य प्रदेश) असे आत्‍महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रामुसिंह हे मुळचे मध्य प्रदेशातील असून सध्या बोपखेल येथे पत्‍नीसह राहत होते. ते सीएमईमध्ये शिपाई म्‍हणून कार्यरत होते. त्यांनी आज सकाळी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्‍याने गळफास घेतला. ही घटना पाहून त्यांच्या पत्‍नीची शुद्ध हरपली. त्यामुळे त्यांना रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,आत्‍महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी अधिक तपास दिघी पोलिस करीत आहेत.

You might also like