पुण्यात हॉटेलच्या बाऊन्सरकडून महाविद्यालयीन युवकांना बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाषाण परिसरातीला हॉटेलात पार्टीसाठी आलेल्या महाविद्याालयीन तरुणांचे गाणे लावण्यावरून वाद झाल्यानंतर तेथील बाऊन्सरनी या तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान, बड्या हॉटेल्समध्ये सुरक्षेच्या कारणांसाठी बाऊन्सर नेमले जातात. त्यांच्याकडून वाद मिटविण्याचे प्रयत्न होण्यापेक्षा मारहाणीचेच प्रकार घडत असल्याचेही यावरून दिसत आहे. नुकतीच सेनापती बापट रस्त्यावीर एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या बाऊन्सरनी तरुणीशी अश्लील वर्तनकरून तिच्या मित्रांना मारहाण केली होती.

याप्रकरणी प्रतीक उत्तम कदम (वय 20,रा. चाणक्य क्लासजवळ, गोखलेनगर) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, योगेश मानकर, वरुण पाटील, रोहन निम्हण तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दहा ते बारा बाऊन्सर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम एका महाविद्याालयात शिक्षण घेतो. त्याच्या महाविद्याालयातील विद्याार्थ्यांनी पाषाण परिसरातील हॉटेल ठिकाणा येथे निरोप समारंभानिमित्त खास पार्टी (फेअरवेल पार्टी) आयोजित केली होती.

गुरुवारी (27 फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या हॉटेल ठिकाणा येथे 100 ते 150 विद्याार्थी जमले होते. या पार्टीसाठी कदम, त्याचे मित्र स्वप्नील शिंगारे, स्वप्नील गव्हाणे, शुभम क्षीरसागर, राहुल होळकर, यश बनसोडे, विनय भुवड हे मोटारीतून तेथे गेले.

त्यानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास हॉटेलमधील ध्वनीवर्धक बंद करण्यात आला. पार्टीसाठी जमलेल्या विद्यााथ्र्यांनी ध्वनीवर्धकारावर गाणी लावण्यास सांगितले. या कारणावरुन हॉटेलमधील कर्मचारी आणि विद्याार्थ्यांमध्ये वाद झाले. त्यानंतर कदम, शिंगारे, गव्हाणे, होळकर, बनसोडे, भुवड हॉटेलमधून बाहेर पडले. त्यावेळी मानकर, पाटील, निम्हण तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दहा ते बारा बाऊन्सरने मारहाण करण्यास सुरुवात केली. लोखंडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. या घटनेत त्यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. दरम्यान, या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.