कपडे घालण्यावरून भाऊ ओरडला, 16 वर्षाच्या मुलीनं रागात सोडलं घर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बहीण लहान कपडे घालत असल्यावरून भाऊ ओरडला. याचा राग आल्याने 16 वर्षाची मुलगी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची मुलगी डिंपल अंतुरेकर (वय 16) सोळा वर्षाची आहे. ती छोटे-छोटे कपडे घालत असे. त्यामुळे तिचा भाऊ तिला रागवला होता. याच रागातून त्यांची मुलगी 19 एप्रिलच्या सायंकाळपासून घरातून निघून गेली आहे. तिचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. तसेच तिचा मोबाईल क्रमांक देखील बंद आहे. तिचा नातेवाईकांकडे कुटुंबियांनी शोध घेतला. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. ती कोणाला आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.