… म्हणून पुण्यातील बिल्डरवर झाला गोळीबार, चौघांविरूध्द खूनाचा FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बिल्डर राजेश हरिदास कानाबार (वय ६३) यांची पुणे पोलीस आयुक्तालयाच्या काही अंतरावर गोळी झाडून झालेल्या खून प्रकरणात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर गोळी झाडणाऱ्याचा अद्याप पत्ता लागलेला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश गुर्हे आणि अज्ञात मारेकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्वास गंगावणे (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हे इमारत सुशोभिकरणाचे व्यावसायिक होते. त्यांचे बावधन येथील १० एकर जागेसंदर्भात काहीजणांशी वाद सुरु होते. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होती. त्यासाठी कानाबार हे आले होते. त्यांनी त्यांची कार आयुक्ताल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसीआय बँकेच्या कॉर्नरला उभी केली होती. चालक कारमध्ये होता.

सुनावणी झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर येउन पायी रस्त्याने कारकडे चालत आले. कारमध्ये बसण्यासाठी उभा असतानाच शासकीय कोषागारजवळ चालत आलेल्या हल्लेखोऱ्याने त्यांची गोळी झाडून हत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच संशयित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तीन जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. मात्र गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.