पुणे : कोरेगांव पार्क परिसरातील 5 फ्लॅट फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम सुरू असून, कोरेगांव पार्क परिसरात दोन इमारतीमधील पाच फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने येथून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी थेरगाव येथील 64 वर्षीय नागरिकाने कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येथील क्वीन्स गार्डन 35 ए या इमारतीत राहण्यास आहेत. त्यांच्या कुटूंबियासह परदेशात फिरण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटे उचकटली. मात्र, त्यात त्यांना काही सापडले नाही. यानंतर त्यांनी फिर्यादींच्या शेजारील आणखी चार फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना त्याठिकाणी देखील काही हाती लागले नाही. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत.

Loading...
You might also like