Pune : शहरात घरफोड्याचं सत्र कायम, मार्केटयार्डात 2 दुकानं फोडली तर कोंढव्यात शाळेचं कार्यालय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी आता घरासोबत दुकाने व व्यवसायिक कार्यालय फोडण्यास सुरवात केली आहे. मार्केटयार्ड येथे दोन दुकाने फोडली. तर, कोंढव्यात शाळेचे कार्यालय फोडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी विजय दहितुले (वय ५०) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय यांचे गंगाधाम चौकात मेडीप्लस नावाचे मेडिकल आहे. 8 ऑक्टोंबर रात्री दहाच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला व चोरीचा प्रयत्न केला. पण, चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. चोरट्यांनी मेडीकलचे 8 हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले. दुसऱ्या हा प्रकार समोर आला आहे. तसेच, काही अंतारावर असलेल्या गंगर आय नेशन शटर उचकटून चोरट्यांनी फोडले. पण, या देखील दुकानात चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, यामध्ये काच व शटरचे ४८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा माग काढला जात आहे. उपनिरीक्षक केतकी चव्हाण अधिक तपास करत आहेत.

तसेच कोंढवा खुर्द परिसरातील रोजबर्डस प्री प्रायमरी स्कूल दोन कार्यालय फोडून मोबाईल लॅपटॉप, सीपीयू असा ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी शहनवाझ खान (वय २८, रा. रामटेकडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी तीन ते पाच ऑक्टोंबर दरम्यान शाळेच्या मुख्यध्यापक व प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या ठिकाणाचे दोन मोबाईल, एक लॅपटॉप, दोन डीव्हीआर, दोन सीपीयू असा ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी शाळेत आले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. अधिक तपास उपनिरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.