Pune : उत्तमनगर परिसरात घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचा धडाका सुरूच असून, उत्तमनगर परिसरात बंद फ्लॅट फोडून 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी राजू महादेव माने (वय 53, रा. माने बिल्डिंग, कामठे वस्ती, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येथील शिवणे परिसरात कामठे वस्तीत राहतात. दरम्यान काही कामानिमित्त ते 15 एप्रिल रोजी घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड व सोन्याचे दागिने असा 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरुज नेला आहे. फिर्यादी हे 20 एप्रिल रोजी परत आले. यावेळी त्यांना घरफोडी झाली असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. उत्तमनगर पोलीसानी प्राथमिक माहिती घेत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.