पुण्यातील येरवडयात भरधाव मर्सिडीज कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भरधाव मर्सिडीज कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरातील कल्याणी नगर येथे घडली. चालकाने वेळीच कार थांबून बाहेर पडल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

रोहन जमादार हे त्यांच्या मित्राची मर्सिडीज कार (क्रमांक.एमएच.12. सीएच.7462) ही घेऊन कामानिमित्त कल्याणी नगर परिसरात आले होते. तेथून ते दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जात असताना अचानक कारमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कार थांबून बाहेर पडले आणि अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारने पेट घेतला होता. काही क्षणातच आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. पाण्याचा माराकरून अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.