डिप्रेशन : पुण्यात व्यावसायिकाची गळफास घेवून आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात तणावातून (डिप्रेशन) एका व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तत्पुर्वी एकाच कुटुंबातील गळफास लावून झालेल्या चौघांच्या मृत्यूने आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे.

स्वप्निल उत्तम रायकर(वय ४५ रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यावसाय आहे. घरची परिस्थिती देखील चांगली आहे. त्यांना दोन मुल आहेत. मात्र ते डिप्रेशनमध्ये होते. त्यांचे डिप्रेशनचे कारण मात्र पोलिसांना समजू शकलेले नाही. दरम्यान आज सकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या भावाने हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.