पुण्यात चप्पल व्यवसायिकाची गळफास लावून आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात एका चप्पल व्यावसायिक तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान शहरात आज सकाळी दाम्पत्याने गळफास लावून घेतल्याचे समोर आली. दरम्यान आत्महत्याच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शुभम राजेंद्र बोबडे (वय २३, रा़ नवजीवन सोसायटी, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम बोबडे हा चप्पल व्यावसायिक होता. त्याचे तुळशीबाग येथे दुकान होते. दरम्यान शुभम याची आत्या (वडिलांची बहीण) याच परिसरात राहते. शनिवारी दुपारी तो आत्याकडे गेला होता. त्यावेळी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्याने हा प्रकार पाहिल्यानंतर ही घटना समोर आले. त्यावेळी पोलिसांना माहिती देण्यात आली. सहकारनगर पोलिसांनी धाव घेतली. शुभम याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तसेच सुसाईड नोट ठेवलेली नाही. पोलिसांकडून आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.