Pune ByPoll Election | कसबा गणपती समोर सोमवारी सकाळी भाजप युती आणि काँग्रेस आघाडीचे शक्ती प्रदर्शन ! कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख विरोधीपक्ष आमने-सामने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ByPoll Election | कसबा मतदार संघातून भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवाराचा अर्जही उद्याच दाखल करण्यात येणार आहे. विशेष असे की या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी सोमवारी सकाळी 9 वाजाता ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूने शक्तीप्रदर्शन करून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. (Pune ByPoll Election)

 

काँग्रेसने संध्याकाळ पर्यंत उमेदवार जाहीर केला नव्हता. परंतु शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी 9.30 वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे.
त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत उमेदवार जाहीर करण्यात येईल. पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर,
कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
मात्र, चार वेळा नगरसेवक आणि दोन वेळा कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून माजी मंत्री खासदार गिरीश बापट
यांना आव्हान देणारे धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Pune ByPoll Election)

दरम्यान, भाजप-शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपाइं युतीचे उमेदवार हेमंत रासने हे देखील सकाळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्र शेखर बावनकुळे, पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष योगेश मुळीक,
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे , अजय भोसले, रिपाइंचे शैलेंद्र चव्हाण
यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

Web Title :- Pune By Poll Election | In front of Kasba Ganapati on Monday morning, BJP alliance and Congress alliance show of power! Major opposition parties head-to-head to file nomination papers for Kasba by-elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास