मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन पुण्यातील (Pune Bypoll Elections) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने (BJP) दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक करावी अशी मागणी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक (Pune Bypoll Elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढवण्यावर ठाम असल्याचे मंगळवारी स्पष्ट केलं. यावेळी कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड देगलूरमध्ये निवडणुका झाल्या आहेत याची आठवण अजित पवारांनी करून दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, मी गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्यामध्ये असणार आहे. मझ्याकडे सात ते आठ जणांनी उमेदवारी मागितली आहे. मला मित्र पक्षासोबत बोलावं लागेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. शिवसेनेसोबत (Shivsena) आम्ही चर्चा केली आहे. बुधवारी आमच्या आमदारांची बैठक आहे. यामध्ये देखील आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. (Pune Bypoll Elections)
दोन्ही जागा लढवण्यावर आम्ही ठाम
यावेळी त्यांनी चिंचवड (Chinchwad By Election) आणि कसबा (Kasba By Election) या दोन्ही जागा लढवण्यावर (Pune By Election) आम्ही ठाम आहोत असे सांगताना कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड देगलूरमध्ये निवडणुका झाल्या आहेत याची आठवण अजित पवारांनी करून दिली. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र त्याप्रकारे आम्ही विचार करत नाही असेही अजित पवार यांनी सांगितले.
चिंचवडमधून 9 जणांनी उमेदवारी मागितली
प्रत्येक पक्षाला आपापली तयारी करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत काँग्रेसचे (Congress) नेते आले नव्हते. परंतु आमची आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. मी गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्यात आहे. त्यावेळी चिंचवडसाठी आतापर्य़ंत माझ्याकडे नऊ जणांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून उमेदवारी मागितली आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलणार आहे.
कँग्रेस-शिवसेनेसोबत चर्चा करुन निर्णय
काँग्रेस आणि शिवसेनेच्या व आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तीच गोष्ट कसब्याबाबत आहे. कसब्यात काँग्रेस तयारी करत असेल. कदाचित पाठीमागील विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी आघाडीत (त्यावेळी मविआ नव्हती) ही जागा काँग्रेसला सोडली होती. पुण्यात गेल्यानंतर माझ्या लोकांशी व काँग्रेससह शिवसेना व इतर मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे
याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात
चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन
पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
Web Title :- Pune Bypoll Elections | ncp ajit pawar on pune chinchwad kasaba peth by election
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Priyanka Chopra | प्रियांका चोप्राने ‘नो फोटो पॉलिसी’ मोडत शेअर केला आपल्या मुलीचा फोटो
- Pune Crime News | ‘आम्ही जनता वसाहतीमधील भाई, खेकडा गँगच्या नादी लागला तर…’,
मुलीकडे बघितल्याच्या संशयावरुन शाळकरी मुलावर कोयत्याने वार - Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन