Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Bypoll Elections | पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba and Chinchwad Bypolls) कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघात २७० तर चिंचवड मतदारसंघात ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. (Pune Bypoll Elections)

 

प्रशासनाकडून मतदार याद्यांचा पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबविण्यात आला. यानुसार ५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांची अंतिम यादी प्रसारित करण्यात आली. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात ३ लाख एक हजार ६४८ पुरूष, २ लाख ६४ हजार ७३२ महिला आणि ३५ तृतीयपंथी असे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांच्या आकडेवारीत सुमारे ४८ हजार १०६ मतदारांची वाढ झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ८७३ पुरूष, १ लाख ३८ हजार ५५० महिला आणि पाच तृतीयपंथी असे एकूण २ लाख ७५ हजार ४२८ मतदार आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंख्येत १५ हजार २५५ ने घट झाली आहे. (Pune Bypolls)

अंतिम मतदार यादीनुसार प्रशासनाकडून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा निवडणुक शाखेकडून देण्यात आली.

 

 

Web Title :- Pune Bypoll Elections | polling stations fixed for kasba chinchwad constituencies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा