पुण्यातील कॅब चालकाच्या मारेकऱ्यांना नागपुरात बेड्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पु्णे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील ओला चलकाचा खून करून फरार झालेल्या आरोपींना नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ३१ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकजण उच्चशिक्षीत असून दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती.

वैभव ऊर्फ पिंटू धनराज बिजेवार (वय ३३,रा. लेंड्रा पार्क, रामदासपेठ) व दिगांबर ऊर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय २५,रा.मोर्शी) अशी अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगारांची नावे आहेत. दिगांबर हा उच्चशिक्षीत असून त्याने बी.टेक केले आहे. तो तीन वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय झाला आहे.
आरोपींनी दोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये मयत वरगडे यांची ओला कॅब केली होती. दोघांनी वरगडे यांचा गोळ्या घालून खून करून त्यांच्या एटीएम कार्डने २० हजार रुपये काढून घेत फरार झाले होते.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला होता. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान पुण्यातील खुनातील आरोपी साताबर्डीमधील लॉजमध्ये असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पी.एम. काळे, हेड कॉन्स्टेबल जयपाल स्वाधीन, शिपाई प्रशांत, चंद्रशेखर, पंकज रामटेके यांच्या पथकाने केली.

You might also like