चालकाला मारहाण करून, कारसह रोकड लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कंपनीच्या कामगारांना घेऊन येण्यासाठी निघालेल्या कार चालकाला मारहाण करून कार, मोबाईल आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार विमानतळ परिसरात घडला आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

[amazon_link asins=’B01IDAXMEO,B07D5FJCG2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc13e725-b89c-11e8-910f-2b8adbf62433′]

कपील दिनेश शर्मा (रा. लोहगाव) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कोळपेवाडी दरोडा : आणखी ६ आरोपींना अटक, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

शर्मा यांनी येरवड्यातील एका आयटी कंपनीमधील कामगारांना पिक अँड ड्रॉपसाठी कार लावली आहे. त्यानुसार ते त्यांची स्विफ्ट कार पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कामगारांना घेऊन येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, लघुशंकेसाठी त्यांनी वाघोली रोडवर कार थांबवली आणि ते उतरले. परत, कारमध्ये बसत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण केली. तर, मोबाईल आणि खिशातील 5 हजाराची रोकड लुटली. त्यानंतर जबरदस्तीने कार घेऊन ते पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.