Pune : पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भरधाव कार कोसळून बुडाली; 2 मुलींचा मृतदेह सापडला, आईचा शोध सुरू तर वडिल सुखरूप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील उरण गावाजवळ भरधाव कार कोसळून बुडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच कुटुंबातील चौघे होते. त्यापैकी 2 मुलींचा मृतदेह सापडला आहे. आईला शोधण्याचं काम सुरू आहे तर वडिल सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (शुक्रवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका संट्रो कार पडल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच या कारचा आणि त्यात असलेल्याचा शोध सुरू केला आहे.

ही माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व वेल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, 2 मुलींचा मृतदेह सापडला असून त्यांच्या आईचा शोध सुरू आहे तर वडिल सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सापडलेल्या मृतदेहापैकी एका मुलीचे वय हे 4 ते 6 च्या दरम्यान आहे तर दुसरीचे वय हे 15 ते 18 दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर माहिती थोडयाच वेळात….