कोंढव्यात भरदिवसा चाकूच्या धाकाने कार पळविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा परिसरात भरदिवसा दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून कार चोरून नेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

अक्षय खुडे (वय 25, रा. येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय एका खासगी कंपनीत कामाला आहे. येवलेवाडीत राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी सकाळी दहाच्या सुमारास तो उंड्रीतील एका मेडीकलसमोर थांबला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी अक्षयला चाकूचा धाक दाखवून कारमधून खाली उरण्यास सांगितले. अक्षय खाली उतरताच एका चोरट्याने कार ताब्यात घेऊन पलायन केले. तर दुसरा चोरटा दुचाकीवर निघून गेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

You might also like