Pune : खटला मॅनेज करण्याचं प्रकरण ! 50 हजाराच्या लाच प्रकरणात पुण्यातील महिला न्यायाधीशास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फौजदारी खटला न्यायाधीशांना मॅनेज करुन रद्द करण्यासाठी खासगी महीलेच्या माध्यमातून ५० हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणात लाच लुचपत विभागाने थेट महिला न्यायाधीश यांना अटक केली आहे. न्यायाधीशालाच अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अर्चना दीपक जतकर (मावळ) असे अटक केलेल्या महीला न्यायधीशाचे नाव आहे. याप्रकरणी मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना अटक केली. तर लाच घेताना प्रथम खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29) यांना एसीबीने 50 हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आज एसीबीने न्यायाधीश अर्चना जतकर याना अटक केली आहे.

प्रकरण काय आहे…
मावळ न्यायलायात सुरु असलेल्या एक फौजदारी खटला मॅनेज करुन रद्द करण्यासाठी खासगी महीलेच्या माध्यमातून ५० हजार लाच स्विकारली होती. तिला अटक केली होती. यानंतर तिच्या मार्फत प्रथम दंडधिकारी महिला न्यायाधीश यांचा सहभाग आढळला. यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांचा सहभाग आढळला.

दरम्यान, अर्चना जतकर यांना अ‍ॅन्टी करप्शनने अटक करण्यापुर्वी त्या स्वतःहून न्यायालयात हजर झाल्या होत्या. त्यांनी न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिलांना याबाबत विचारले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकार्‍यांनी न्यायालयात धाव घेतली आणि जतकर यांचा सदरील गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे सरकारी वकिल विलास घोगरे-पाटील यांच्यामार्फत सांगितले. न्यायालयाने जतकर यांचा जामीनाचा अर्ज अमान्य करत जतकर यांची कस्टडी अ‍ॅन्टी करप्शनला दिली.