Pune : पैश्यासाठी विवाहितेचा छळ, पतीवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पहिले लग्न झालेले असताना त्याची माहिती लपवून दुसरे लग्न केल्यानंतर त्या विवाहितेचा माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल दिलीप साठे (वय ३२, रा. पद्मावती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता. पण, आरोपीचे अगोदरच दुसरे लग्न झाले होते. त्याची माहिती आरोपीने फिर्यादी यांना दिली नाही. तसेच, लग्नानंतर नांदविण्यास घेऊन जाण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये व चार तोळे घेऊन येण्याची मागणी केली. याबाबत पोलिसांकडे गेली तर घटस्फोट देण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.