Pune : पोलिस निरीक्षकानं महिलेला शीतपेयातून दिलं गुंगीचं औषध, लैंगिक अत्याचार करत काढले फोटो अन् केला व्हिडीओ रेकॉर्ड, FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सोलापूर येथील पोलिस निरीक्षकाने पुण्यात महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील भवानी पेठ पोलीस लाईनमध्ये हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत माने हे सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीस आहे. हे माने पुण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांची व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर घर दाखविण्याच्या बहाण्याने चंद्रकांत यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलीस लाईनमध्ये नेले होते. त्याठिकाणी त्याने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून महिलेवर अत्याचार केले.

त्याचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग केले. त्यानंतर व्हिडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देउन चंद्रकातने महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. तुझ्यासोबत लग्न करेन अशी बतावणी करुन वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी महिलेला दिली होती. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like