Pune News : कॉफी पिण्यासाठी कार पार्क केली, परत येऊन पाहिलं तर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावर कार उभी (Car Park) करुन कॉफी (Coffee) पिण्यास जाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात व्यक्तीने कारची काच फोडून कारमधील दोन लॅपटॉपसह (Laptop) रोख रक्कम (Cash) असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून (Stolen) नेला. हा प्रकार रविवारी (दि.20) रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील फग्युर्सन कॉलेज (FC Road) समोरील रस्त्यावर घडला.

याप्रकरणी रोहन बोथरा (वय-25 रा. अहमदनगर) यांनी डेक्कन पोलीस (Deccan Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन बोथरा हे रविवारी रात्री फग्युर्सन कॉलेज समोरील रस्त्यावर कार पार्क करुन स्टार बक्स कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या कराच्या डाव्या बाजूची काच फोडून कारमध्ये सीटवर ठेवलेले दोन लॅपटॉप आणि सात हजार रुपये असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

कॉफी पिऊन आल्यानंतर बोथरा यांना कारच्या डाव्या बाजूची काच फोडल्याचे दिसून आले. तसेच कारमध्ये सीटवर ठेवलेले दोन लॅपटॉप दिसले नाहीत. बोथरा यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताताडीने डेक्कन पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. डेक्कन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला आहे.