Pune : शतपावली करणार्‍या तरूणीच्या गळयातील सोनसाखळी हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   डिनर केल्यानंतर घराबाहेर शतपावली करणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील २३ हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. चंदननगर-खराडी रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. चंदननगर भागात राहायला आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर ती रस्त्यालगत शतपावली करीत होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने तरुणीच्या गळ्यातील २३ हजारांची सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली. तिने आरडा-ओरडा केला. पण तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.