Pune : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात भल्या सकाळी दुकानातून दुध आणण्यास गेल्यानंतर चोरट्यांनी पाठलागकरून महिलेच्या गल्यातील 60 हजार रुपयांचे चैन हिसकावून नेली. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अश्विनी अभिजीत घुमटकर (वय २८ ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी या गृहिणी आहेत. काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या दूध खरेदी करण्यासाठी समर्थ डेअरीमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर पायी घरी परतत असताना पाठीमागून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारुन तोडून नेले. अश्विनी यांनी आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.