मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी जरबदस्तीने हिसकामारून नेल्याची घटना समोर आली आहे. वडगाव बुद्रुक परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी ज्योती बोराटे (वय 48, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या मैत्रिणीसोबत शेळकेनगर परिसरात मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या.

त्यावेळी पाठिमागून दुचाकीवर भरधाव आलेल्या चोरट्यांने त्यांच्याजवळ येत गळ्यातील 38 हजार रुपयांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. परंतु चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like