नातवाला खेळवणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – घराच्या समोर नातवाला सायकल खेळवणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी जरबदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मांजरी बुद्रुक परिसरातील बेल्हेकर वस्ती येथे राहण्यास आहेत. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या दोन वर्षाच्या नातवाला दारासमोर सायकल खेळवत होत्या. यावेळी अचानक दुचाकीवर दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी दुचाकी त्यांच्यासमोर लावली व त्यांना थांबविले. त्याचवेळी पाठिमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची सोन्याची साखळी चबरदस्तीने हिसकामारून चोरून नेली. त्यांनी आरडा-ओरडा केला. परंतु, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे करत आहेत.