पुणे व्यापारी महासंघा तर्फे लसीकरण शिबीर संप्पन्न; 500 हून अधिक जणांचे लसीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   व्यापारी महासंघ व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने वय वर्षे ४५ च्या वरील दुकानातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .त्यात आज ५०० हुन अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले . नूतन मराठी विद्यालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

पुणे मनपाचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सध्या कोरोना चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असून त्याला रोखण्यासाठी कामगारांचे लसीकरण करून घ्या असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांना भेटी दरम्यान केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने आपल्या सदस्यांना लसीकरणाला प्रवृत्त करत आगाऊ नोंदणी करून घेतली होती. प्रत्येकाचे रीतसर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करून घेण्यात आले होते .लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीस डॉक्टरांच्या निगराणी खाली अर्धा तास थांबवून अल्पोपहार चहा देऊन सोडून देण्यात येत होते.

सध्या लसींची टंचाई असल्याने आत्ता पुढील लसीकरण शिबिरासाठी लसी उपलब्ध झाल्यानंतर व्यापारी महासंघातर्फे पुन्हा लसीकरण शिबीरे आयोजित करण्यात येतील असे व्यापारीमहासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी जाहीर केले. सदस्यांनी व कामगारांनीं मोठ्या संख्येने नावनोंदणी करावी ज्या योगे नियोजन करणे सोपे जाईल असे आवाहन सचिव महेंद्र पितळीया यांनी केले .

मनपा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ .वैशाली जाधव ,वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉ .गोपाळ उजवानकर यांच्या देखरीखाली हे शिबीर संपन्न झाले . शिबीर यशस्वी करण्यासाठी राहूल हजारे ,मिलिंद शालगर ,नितीन काकडे ,कुमार भोगशेट्टी ,नितीन पोरवाल ,संजय मुणोत ,मनोज सारडा , मुझफ्फर इनामदार, मिठालाल जैन ,मनोज शहा ,प्रशांत टिकार ,अमित मुणोत ,राकेश बांबोळी.राजू ओसवाल आदींनी प्रयत्न केले.